SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्त! वेदनेचे समाजशास्त्र समजून घेण्याची गरज : ‘जेएनयू’तील प्रा. विवेक कुमार यांचे मत; प्रा. जगन कराडे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कारडीकेटीईच्या विद्यार्थ्यांची आयआयटी दिल्ली येथे युथ आयडियाथॉन राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत यशस्वी कामगिरीछत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपतींच्या राजकोट येथील पुतळ्याचे दर्शन व पूजनस्टार एअरने कोल्हापूरला बेंगळुरू, हैदराबाद व नागपूर या मेट्रो सिटीशी विमान सेवेतून जोडलेफिल्म मेकिंगच्या विद्यार्थ्यांची ‘मेटाफर’ यशवंत लघुपट महोत्सवात झळकली!‘केआयटी’ चा विद्यार्थी शाहू माने शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानितकळंबा येथे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी, अंबाबाई देवीचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहाततामगांव ते उजळाईवाडी रस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीस बंद केरळमध्ये २७ मेपर्यंत मान्सूनचे आगमन

जाहिरात

 

डीकेटीईच्या विद्यार्थ्यांची आयआयटी दिल्ली येथे युथ आयडियाथॉन राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत यशस्वी कामगिरी

schedule11 May 25 person by visibility 345 categoryशैक्षणिक

इचलकरंजी : डीकेटीईच्या इलेक्ट्रीकल व मेकॅनिकल विभागातील विद्यार्थी सुजल करोशी, साक्षी पाटील, अंकिता मुरगुंडी, सानिका जगताप, हर्षद गडकरी व तनय वायंगणकर यांनी  कॉलेज युथ आयडियाथॉन २०२५ या आय.आय.टी.दिल्ली येथे झालेल्या प्रतिष्ठित राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभाग घेवून दर्जेदार कल्पनेचे सादरीकरण करुन उल्लेखनीय यश मिळविले आहे. त्यांनी आपल्या नाविण्यपूर्ण स्मार्ट गॅस फ्लेम कंट्रोल या प्रकल्पाद्वारे परिक्षकांची मने जिंकली. यामुळे डीकेटीई संस्थेचा नावलौकीक उंचवला आहे. स्टार्टअप संकल्पना आणि उद्योजकीय वृत्तीला प्रोत्साहन देणा-या या स्पर्धेमध्ये देशभरातून ४५ हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी स्मार्ट गॅस फ्लेम कंट्रोल नावाचा नाविण्यपूर्ण प्रकल्प विकसीत केला असून या नाविण्यपूर्ण प्रकल्पाला स्पर्धेच्या विविध टप्प्यांमध्ये मोठे यश मिळाले. विद्यार्थ्यांनी विकसीत केलेले स्मार्ट गॅस फ्लेम कंट्रोल हे डिव्हाईस अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुस्सज आहे. या डिव्हाईसमध्ये गॅस गळती सेन्सॉर, ज्वाला निरिक्षण युनिट, वॉयरलेस मॉडयूल आणि स्वयंचलित गॅस कट-ऑफ सिस्टीम यांचा समावेश असून, संपूर्ण प्रणाली मोबाईल ऍपद्वारे सहज नियंत्रित करता येते.

 वापरकर्त्यांना ज्वालेची तिव्रता समजते, स्टोव्हची स्थिती पाहता येते. गॅस गळती किंवा ज्वाला विझल्यास त्वरीत ऍलर्ट मिळतो. अशा वेळी ही प्रणाली आपोआप गॅसचा पुरवठा थांबवते जे सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. हे डिव्हाईस वायफाय आणि ब्ल्यूटयूथ कनेक्टिव्हिटीसह कार्यरत असून, कमी नेटवर्क क्षेत्रातही उत्तम कार्यक्षमता राखते.
या स्पर्धेमध्ये विविध फे-यांचा समावेश होता पहिल्या फेरीत डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी टॉप १००० मध्ये स्थान मिळविले,पुढच्या फेरीत १५० मध्ये स्थान मिळविले तर अंतिम टॉप १०० फायनालिस्टमध्ये मानाचे स्थान पटकविले. 

हा प्रकल्प डीकेटीईच्या आयडिया लॅबमध्ये विकसीत केला असून या प्रकल्पाचे आणखीन मोठे यश म्हणजे पेटंट नोंदणी मिळाली आहे. ही तांत्रिक दृष्टीकोनातून एक मोठी उपलब्धता मानली जाते.

या यशामध्ये डीकेटीईमध्ये दिल्या जाणा-या गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच प्रात्यक्षिकावर अधारित प्रशिक्षण, इंडस्ट्री रिलेटेड स्पॉण्सर्ड लॅबस, जागतिक स्तरावरील अत्याधुनिक यंत्रसामुग्रीची इन्स्टिट्यूटमध्ये असलेली उपलब्धता,तज्ञ प्राध्यापक, ग्रंथालय सेवा यामुळेच विद्यार्थी तांत्रिकदृष्टया सक्षम होत असून अशा तांत्रिक स्पर्धेमध्ये सहभाग घेवून राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवित आहेत.

डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे तसेच सर्व पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.विद्यार्थ्यांना इन्स्टिटयूटच्या संचालिका प्रा.डॉ.एल.एस.अडमुठे, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे. पाटील, विभागप्रमुख डॉ.व्ही.आर.नाईक, डॉ आर.एन.पाटील, डॉ व्ही.बी.मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes