SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
नवीन क्रिकेट मैदानासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला मदत करु : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; वानखेडे मैदानावरील भव्य सोहळ्यात स्टँडला रोहित शर्मा यांचे नावगुडाळ येथील स्वर्गीय इंदिरा पाटील दूध संस्थेच्या पदाधिकार्‍यांसह प्रमुख कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश, खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून स्वागतहिंगोली येथील फरार आरोपी व साथीदाराकडून आंतरजिल्ह्यातील चोरीच्या 8 मोटर सायकली जप्तनिवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी ऑनलाईन फसवणुकीपासून सावध रहावे नेपाळ येथील स्पर्धेत जानवी लोढाचे दुहेरी यश श्रीलंकेतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅटट्रिक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पदकांची लयलूट करणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाची भारतीय गुणवत्ता परिषदे मार्फत तपासणीगोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या राजीनाम्याचा प्रश्न सामंजशाने सुटेल; आमदार सतेज पाटील...अन्यथा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय आणि मेघा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकू; आमदार सतेज पाटील यांचा इशाराघोडावत विद्यापीठातील दोनशेहून विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट

जाहिरात

 

छोट्यांच्या सुट्टीत मोठ्यांची शाळा – आला आहे ‘आता थांबायचं नाय’चा धमाल भोलानाथ !

schedule23 Apr 25 person by visibility 251 categoryमनोरंजन

मुंबई  : झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ निर्मित ‘आता थांबायचं नाय’ या प्रेरणादायी चित्रपटातील “सांग सांग भोलानाथ” हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून, बालपणातल्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देताना मोठ्यांच्या हृदयात नव्याने आपली जागा निर्माण करतय!

या बालगीताला नव्याने संगीत दिलेय गुलराज सिंग यांनी, मजेशीर पण विचार  करायला भाग पडणारे नवीन बोल लिहिलेत मनोज यादव यांनी, आणि आवाज दिलय आपल्या सर्वांचे लाडके, आवाजाचे जादूगार अवधूत गुप्ते यांनी.  हे गाणं सध्या प्रेक्षकांच्या मोबाईल, सोशल मीडिया आणि मनात repeat mode वर सुरु आहे!

अवधूत गुप्ते म्हणतात, “‘सांग सांग भोलानाथ’ हे बडबडगीत नुसतं गायचं नव्हतं तर  त्याला एक सिनेमाच्या पात्रांसाठी जे वेगळं स्वरूप देण्यात आलं ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या मनात खोलवर रुजवायचं होत , हे  गाणं इतकं सर्व समावेशक आहे कि या लहान मुलांसोबत गाताना मी पण लहान झालो झालो होतो – एक आठवण, एक vibe, एक reconnecting moment होती माझ्यासाठी.  अशी गाणी क्वचितच गायला मिळतात जे त्यां ची जुनीआठवण जपत नव्या स्वरूपात आपल्याला समोर सादर होतात." 

दिग्दर्शक शिवराज वायचळ सांगतात, “‘भोलानाथ’ हे गाणं अगदी कथानक तयार करतानाच मनात होतं. बालपणीच्या आठवणी जागवणाऱ्या या गाण्याला नव्या पिढीसाठी सादर करणं हे आमचं स्वप्न होतं. गुलराजचं धमाल संगीत, मनोजचे अभ्यासू बोल आणि अवधूतचा जादूई आवाज – या तिघांनी मिळून या गाण्याला एक वेगळीच उंची दिली आहे. मुलांनी त्यांचा व्हर्जन मनापासून एन्जॉय केलंय आणि आता पालक देखील या गाण्याचं हे टवटवीत नवं रूप नक्कीच एन्जॉय करतील.”

‘आता थांबायचं नाय’ चित्रपट हा संघर्ष, स्वप्नं, धैर्य आणि प्रेरणेची कहाणी सांगतो. भरत जाधव, आशुतोष गोवारीकर, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे, ओम भुतकर, पर्ण पेठे, श्रीकांत यादव आणि रोहिणी हट्टंगडी यांसारख्या दमदार कलाकारांनी या सत्यकथेवरुन प्रेरित असणाऱ्या चित्रपटाला अभिनयाचं सशक्त पाठबळ दिलय !

 ‘सांग सांग भोलानाथ आपल्या बच्चेकंपनी सोबत सुट्टीत एन्जॉय करा ,आपल्या लहानपणीच्या खट्याळ आठवणींना उजाळा द्या आणि नव्या पिढीला एक नवीन गोष्ट सांगा ,आपल्या लहानग्यांसोबत नक्की या  १ मे २०२५ रोजी, ‘आता थांबायचं नाय’ हा सिनेमा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात पाहायला !

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes