SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
दोन हजारांहून अधिक नागरिकांची घरपोच मोफत हृदय तपासणी मोहीम : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफगोकुळ दूध संघाच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ करा; भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांची प्रशासक मंडळाकडे मागणीशिवराज्याभिषेक दिनानिमित्त 'आप'तर्फे रक्तदान शिबिर५० वर्षांचा प्रलंबित रस्ता प्रश्न मार्गी; आता मुरमीकरण व डांबरीकरण लवकरच : आमदार यड्रावकरशाहुवाडीतील दरोड्याचा मास्टर प्लॅन उघड; ५ सराईत दरोडेखोर गजाआड!अंबाबाई मंदिर परिसरातील सुविधांची जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड व आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडून संयुक्त पाहणीकोल्हापूर : मित्रानेच केला विश्वासघात; बहिरेश्वरमधील चोरीचा २४ तासांत छडाअखिल भारतीय हिंदू महासभेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी डॉ. देवेंद्र रासकर यांची सलग सातव्यांदा निवडमान्सून काळात प्रशासनाने सज्ज राहावे; प्रशासनाला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सूचनापुणे पदवीधर पुरवणी मतदार नोंदणीत कोल्हापूर पिछाडीवर; पदवीधरांनी मोठ्या संख्येने मतदार नोंदणी करण्याचे माणिक पाटील-चुयेकर यांचे आवाहन

जाहिरात

 

गोकुळ दूध संघाच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ करा; भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांची प्रशासक मंडळाकडे मागणी

schedule06 Jun 26 person by visibility 242 categoryउद्योग

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाने दूध विक्री दरात वाढ केल्यानंतरही दूध उत्पादकांना मिळणाऱ्या खरेदी दरात वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर गाय व म्हैस दुधाच्या खरेदी दरात किमान प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने गोकुळ दूध संघाच्या प्रशासक मंडळाकडे केली.

भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गोकुळ दूध संघाच्या प्रशासक मंडळाची सदिच्छा भेट घेत विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी प्रशासक मंडळाचे अध्यक्ष संजयकुमार सुद्रिक, सदस्य प्रदीप मालगावे, सागर बलकवडे, डॉ. चंद्रकांत परुळेकर तसेच कार्यकारी संचालक गोडबोले उपस्थित होते.

यावेळी शिष्टमंडळाने गोकुळच्या पशुखाद्याच्या दर्जाबाबत येणाऱ्या तक्रारी, बल्क कुलर व्यवस्थेतील अडचणी, जप्त व दुय्यम प्रतीच्या दुधाबाबत उत्पादकांना न्याय मिळावा यासाठी योग्य निर्णय घेण्याची मागणी केली. तसेच ताळेबंदातील ‘वरकड खर्च’ या प्रकारामुळे सर्वसामान्य दूध उत्पादकांना अपेक्षित आर्थिक लाभ मिळत नसल्याने हा खर्च कमी करून त्याचा लाभ थेट दूध उत्पादकांना देण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली.

प्रशासक मंडळाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रशासक मंडळाने कार्यभार स्वीकारल्यानंतर गेल्या महिन्यात दूध विक्री दरात लक्षणीय वाढ केली आहे. परंतु परंपरेनुसार दूध विक्री दर वाढल्यानंतर दूध उत्पादकांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या दुधाच्या दरातही वाढ होणे अपेक्षित असते. मात्र अद्याप खरेदी दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

सध्या पेट्रोल-डिझेल, पशुखाद्य, वैरण तसेच अन्य उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्यामुळे दूध व्यवसाय करणे अधिक खर्चिक झाले आहे. अशा परिस्थितीत दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी गाय व म्हैस दुधाच्या खरेदी दरात किमान प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी युवक नेते अलकेश कांदळकर, भुदरगड तालुकाध्यक्ष भगवान शिंदे, संतोष पाटील, वसंतराव प्रभावळे, मोहन सूर्यवंशी, सुनील तेली, अमोल पाटील, पांडुरंग वायदंडे, संजय भोसले, जिल्हा सरचिटणीस महेश चौगुले, करवीर तालुकाध्यक्ष सतीश पाटील, कागल तालुकाध्यक्ष एकनाथ पाटील, पोपुचंद पवार, परशुराम महाडिक, युवराज जाधव, नेताजी झांबरे पाटील, निवास देसाई, ऋषिकेश पाटील, प्रवीण पाटील, किरण काशीद यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes