SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोकुळ दूध संघाच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ करा; भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांची प्रशासक मंडळाकडे मागणीशिवराज्याभिषेक दिनानिमित्त 'आप'तर्फे रक्तदान शिबिर५० वर्षांचा प्रलंबित रस्ता प्रश्न मार्गी; आता मुरमीकरण व डांबरीकरण लवकरच : आमदार यड्रावकरशाहुवाडीतील दरोड्याचा मास्टर प्लॅन उघड; ५ सराईत दरोडेखोर गजाआड!अंबाबाई मंदिर परिसरातील सुविधांची जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड व आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडून संयुक्त पाहणीकोल्हापूर : मित्रानेच केला विश्वासघात; बहिरेश्वरमधील चोरीचा २४ तासांत छडाअखिल भारतीय हिंदू महासभेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी डॉ. देवेंद्र रासकर यांची सलग सातव्यांदा निवडमान्सून काळात प्रशासनाने सज्ज राहावे; प्रशासनाला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सूचनापुणे पदवीधर पुरवणी मतदार नोंदणीत कोल्हापूर पिछाडीवर; पदवीधरांनी मोठ्या संख्येने मतदार नोंदणी करण्याचे माणिक पाटील-चुयेकर यांचे आवाहनस्वराज्यगुढी: छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक राज्याभिषेक

जाहिरात

 

अंबाबाई मंदिर परिसरातील सुविधांची जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड व आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडून संयुक्त पाहणी

schedule06 Jun 26 person by visibility 121 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : श्री अंबाबाई मंदिर परिसरातील शौचालय व्यवस्था, पार्किंग सुविधा, अतिक्रमणे तसेच भाविकांसाठी उपलब्ध करण्यात येणाऱ्या विविध सुविधांची आज जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड व कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी सकाळी 9.30 ला संयुक्त पाहणी केली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाने, उपशहर अभियंता सुरेश पाटील, इस्टेट ऑफिसर शेखर साळुंखे तसेच देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे राजवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लोंढे आदी उपस्थित होते.

या पाहणीदरम्यान राजाराम हायस्कूलजवळील पार्किंग जागेची पाहणी करून सदर पार्किंग सुविधा कायमस्वरूपी खुली ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच पागा बिल्डिंग येथील सार्वजनिक शौचालय स्वच्छ व सुस्थितीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.

विद्यापीठ हायस्कूलसमोरील परिसरात नवीन सार्वजनिक शौचालय उभारण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
महाद्वार रोड, ज्योतिबा रोड व मंदिरालगतच्या परिसरातील अतिक्रमणांची पाहणी करून अनधिकृत अतिक्रमणे तातडीने हटविण्याचे आदेश जिल्हाधिकारी व आयुक्त यांनी दिले. तसेच मंदिर परिसरातील वाहतूक सुरळीत राहावी व भाविकांना ये-जा करताना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी मंदिरालगत असलेले फुलविक्रेत्यांचे स्टॉल हटविण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

देवस्थान समितीने मंदिर परिसरात अधिक सुरक्षारक्षक नियुक्त करून महाद्वार रोड परिसर मोकळा व सुव्यवस्थित ठेवावा, अशा सूचना आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी यावेळी दिल्या.

त्याचबरोबर मंदिर परिसरातील अतिक्रमणे 10 जून 2026 पूर्वी स्वतःहून काढून घ्यावे असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड व कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes