भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांचा सामाजिक भान जोपासणारा उपक्रम
schedule14 May 25 person by visibility 313 categoryराजकीय

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी आकुर्डे, ता. भुदरगड येथील नाथाजी पाटील यांची फेरनिवड झाली आहे. निवडीनंतर त्यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी सामाजिक भान जोपासत एक नवीन उपक्रम राबविला आहे.
पाटील हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते असून त्यांनी गावपातळीपासून जिल्हास्तरापर्यत पक्ष संघटन वाढीसाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या महत्वपूर्ण योगदानाची दखल घेत त्यांना पक्षाने जिल्हाध्यक्षपदाची पुन्हा संधी दिली आहे.
याबाबत नाथाजी पाटील म्हणाले, मला निवडीनिमित्त शुभेच्छा द्यायला येणाऱ्या सर्वांनी कोणत्याही प्रकारचे पुष्पहार, बुके, पुष्पगुच्छ, फेटा, अथवा शाल घेऊन येऊ नये. त्याऐवजी सदरची रक्कम भाजपा कार्यालयात ठेवलेल्या एका बॉक्समध्ये जमा करावी. सदर जमा झालेली रक्कम जिल्हा सैनिक कल्याण निधीकडे जमा केली जाईल. माझी विनंती आहे की, या उपक्रमाला सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.