डीकेटीईमध्ये प्रथमवर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरण्यास उत्स्फुर्त प्रतिसाद
schedule26 Jul 25 person by visibility 334 categoryशैक्षणिक

इचलकरंजी : अभियांत्रिकी प्रवेशासाठी पहिल्या फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया दिनांक २६ जुलैपासून सुरु झालेली आहे. प्रथम फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर मिळालेला प्रवेश स्वीकारणेही अत्यंत महत्वाची स्टेप आहे. डीकेटीईच्या लायब्ररी मध्ये सर्व विद्यार्थ्यांना ऑप्शन भरण्यासाठी मोफत तज्ञ मार्गदर्शन देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. पहिल्याच दिवशी पालक व विद्यार्थ्यानी उत्साहात या सुविधेचा लाभ घेतला आहे. ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी मुदत दिनांक २८-७-२०२५ पर्यंत आहे.
या वर्षी इंजिनिअरींगच्याप्रवेश प्रक्रियेचे एकूण चार राऊंड आहेत. विद्यार्थ्यांनी संपूर्ण प्रवेश प्रक्रियेवेळी अत्यावश्यक काळजी घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी करिअरच्या या महत्वाच्या टप्प्या वर प्रवेश प्रक्रिये दरम्यान होणाऱ्या चुका व गैरसमजुती टाळाव्यात तसेच चालू वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेतील वेगळेपणा या मुददयांची सखोल माहीती घेवून आपल्या करिअरचा मार्ग सुखकर करावा.
तरी याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा असे अवाहन डीकेटीई संस्थेच्या संचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस.आडमुठे व डेप्युटी डायरेक्टर प्रा.डॉ.यु.जे.पाटील यांनी केले आहे. प्रवेश प्रक्रियेच्या माहितीसाठी प्रवेश प्रक्रियेचे इनचार्ज प्रा. डॉ. ए. के. घाटगे ७०८३२५३६७२ यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.