SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
नवीन क्रिकेट मैदानासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला मदत करु : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; वानखेडे मैदानावरील भव्य सोहळ्यात स्टँडला रोहित शर्मा यांचे नावगुडाळ येथील स्वर्गीय इंदिरा पाटील दूध संस्थेच्या पदाधिकार्‍यांसह प्रमुख कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश, खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून स्वागतहिंगोली येथील फरार आरोपी व साथीदाराकडून आंतरजिल्ह्यातील चोरीच्या 8 मोटर सायकली जप्तनिवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी ऑनलाईन फसवणुकीपासून सावध रहावे नेपाळ येथील स्पर्धेत जानवी लोढाचे दुहेरी यश श्रीलंकेतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅटट्रिक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पदकांची लयलूट करणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाची भारतीय गुणवत्ता परिषदे मार्फत तपासणीगोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या राजीनाम्याचा प्रश्न सामंजशाने सुटेल; आमदार सतेज पाटील...अन्यथा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय आणि मेघा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकू; आमदार सतेज पाटील यांचा इशाराघोडावत विद्यापीठातील दोनशेहून विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट

जाहिरात

 

कोल्हापूर : बगीचाच्या आरक्षणामधील बाधित होणारे 11 विनापरवाना शेड हटविले

schedule23 Apr 25 person by visibility 329 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर  : बी वॉर्ड, रि.स.न.770 ही मिळकत आरक्षण क्रमांक 251 बगीच्यासाठी आरक्षित आहे. या आरक्षीत जागेमधील जागा मालकांपैकी रणजीत साळुंखे यांनी 11 विनापरवाना शेड उभाकरून ती भाड्याने दिले होती. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम  १९६६ चे कलम 53 (1) अंतर्गत दिनांक ११ ऑक्टोंबर २०२४ रोजी नोटीस लागू करण्यात आली होती. या जागेवरील विनापरवाना बांधण्यात आलेले शेड काढून घेण्यास समज देण्यात आली होती. सदर शेडचे  विनापरवाना बांधकाम काढून न घेता रणजीत साळुंखे यांनी न्यायालयात रे.क. नं 840/2024 दावा दाखल केला होता. सदरच्या विनापरवाना शेडवर कारवाई करू नये म्हणून मनाई मिळणेस मागणी न्यायालयाकडे केली होती.

 परंतू या नोटिसी संदर्भात दावा सुरू असल्याने पुढील कारवाईसाठी कायदेशीर अभिप्राय घेऊन न्यायालयाचा कोणताही मनाई हुकूम कोल्हापूर महानगरपालिका विरुद्ध नसल्याने 11 विनापरवाना उभारण्यात आलेले शेड आज काढण्यात आले. .

सदरची कारवाई नगररचना, विभागीय कार्यालय क्र.1, विद्युत व अतिक्रमण विभागाच्या संयुक्त मोहिमेद्वारे करण्यात आली. यावेळी पोलीस बंदोबस्तात विनापरवाना शेड उतरून घेण्यात आले. सदरची कारवाई सहाय्यक संचालक नगररचना विनायक झगडे व उपशहर रचनाकार रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर अभियंता महादेव फुलारी, कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले, सुनील भाईक, चेतन आरमाळ व कर्मचाऱ्यांनी केली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes