कोल्हापूर महापालिकेच्यावतीने तावडे हॉटेल परिसरातील 11 अतिक्रमणावर कारवाई
schedule17 Oct 25 person by visibility 79 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : तावडे हॉटेल परिसरातील कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वारावरील अतिक्रमण काढण्याचे प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आदेश दिले होते. त्यानुसार आज विभागीय कार्यालय क्रमांक.4 छ.ताराराणी मार्केट, अतिक्रमण, विद्युत, इस्टेट व वर्कशॉप विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत तावडे हॉटेल परिसरातील 11 अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली.
यामध्ये तनवानी हॉटेल जवळी 2 टपऱ्या, 1 मोठा जनरेटर, तनवाणी हॉटेलच्या पलीकडच्या बाजूला असलेल्या 6 टपऱ्या, रस्त्याच्या मध्येच उभा केलेला पर्यटन स्थळदर्शक बोर्ड, चिकन विक्रेत्यांच्या 2 टपऱ्या अशा एकूण 11 अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे कोल्हापूर शहरात प्रवेश करणारा रस्ता अतिक्रमण मुक्त होऊन वाहतुकीस संपुर्ण रस्ता खुला झाला आहे. या कारवाईसाठी 2 जेसीबी, 2 ट्रॅक्टर, 1 डंपर, 1 गॅस कटर, 1 बुमचा वापर करण्यात आला.
सदरची कारवाई अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त परितोष कंकाळ व शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.आयुक्त कृष्णा पाटील, उपशहर अभियंता निवास पोवार, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, सहा.अभियंता नारायण पुजारी, कनिष्ठ अभियंता उमेश बागूल, अनुराधा वांडरे, अमित दळवी, सर्व्हेअर दत्ता पारधी व कर्मचारी यांनी केली.