SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महापालिकेच्यावतीने तावडे हॉटेल परिसरातील 11 अतिक्रमणावर कारवाई‘गोकुळ’ची म्हैस व गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपयेची वाढ...स्टार्टअप्सनी भारत सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा : डॉ. सी. एस. यादव; केआयटी आय.आर.एफ. च्या कोहॉर्ट-२.0 या उपक्रमाचे उद्‌घाटननांदगाव येथे कृषी विषयक ग्राम परिसंवाद कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनशाही दसरा महोत्सव: विजेत्यांना बक्षीस वितरण, उत्कृष्ट कामांचाही सन्मानआरटीओकडून कारवाईपोटी 2 लाखाचा दंड वसूलजांभळी गावाप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक गावात हिरवाई निर्माण करावी : जिल्हाधिकारी अमोल येडगेछत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास प्रशासनाची परवानगीमाफक दरात, सुंदर कलाकृतींचा लाभ नागरिकांनी घ्यावा : जिल्हाधिकारी अमोल येडगेकोल्हापूर शहरात अमृत योजनेअंतर्गत टाकण्यात आलेल्या लाईनवर नागरीकांनी आपली नळ कनेक्शन शिफ्ट करावी; अन्यथा...

जाहिरात

 

शाही दसरा महोत्सव: विजेत्यांना बक्षीस वितरण, उत्कृष्ट कामांचाही सन्मान

schedule17 Oct 25 person by visibility 78 categoryसामाजिक

  🔹येणाऱ्या महोत्सवासाठी आतापासूनच तयारी करा : जिल्हाधिकारी अमोल येडगे
  🔹दसरा महोत्सव ट्रस्टच्या बैठकीतून महत्त्वपूर्ण सूचना

  कोल्हापूर : कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव यंदा राज्य शासनाने राज्यातील प्रमुख महोत्सव म्हणून मान्यता दिल्यानंतर प्रशासनासह जिल्ह्यातील सर्व स्तरांतील नागरिकांनी सहभाग घेत हा महोत्सव यशस्वी केला. या महोत्सवांतर्गत चित्रकला, निबंध स्पर्धा, कलापथक आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमधील विजेत्यांना जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या हस्ते प्रमाणपत्रे आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

  यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, तहसीलदार तेजस्विनी पाटील, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी अमित सुतार यांच्यासह विजेते स्पर्धक, त्यांचे कुटुंबीय आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

  बक्षीस वितरण समारंभात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थितांना येणाऱ्या काळात शाही दसरा महोत्सवाला अधिकाधिक उपक्रमांद्वारे लोकोत्सव बनवण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दसरा महोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याबद्दल आणि प्लास्टिकमुक्त कोल्हापूर उपक्रमाबद्दल जिल्हाधिकारी यांचे आभार मानले. या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य केलेल्या मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला. यामध्ये हॉटेल मालक असोसिएशनचे सचिन शानबाग, क्रेडाईचे आदित्य बेडेकर, प्रमोद पाटील, उदय गायकवाड यांच्यासह पोलिस विभागाचे उपनिरीक्षक तानाजी सावंत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, महेश कांजर, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, छायाचित्रकार अनिल यमकर आणि व्हिडीओग्राफर सतिश शेंडगे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

  दसरा महोत्सव ट्रस्टच्या विश्वस्तांच्या बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या बैठकीत ट्रस्टच्या कामकाजाबाबत सविस्तर चर्चा झाली. जिल्ह्यातील पर्यटकांच्या संख्येत वाढ व्हावी यासाठी ट्रस्टच्या माध्यमातून वर्षभर कामकाज पाहण्यासाठी विविध समित्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. येणाऱ्या काळात पुढील महोत्सवाच्या तयारीसाठी आतापासूनच नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

 🔹स्पर्धेतील विजेते -
जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा- कोल्हापूर महानगरपालिका व इचलकरंजी नगरपालिका (एकत्रित)
प्रथम- वैष्णवी अमर फाटक, इ. 10 वी, रामभाऊ जगताप हायस्कूल, इचलकरंजी
व्दितीय- श्रावणी सागर माळी, इ. 10 वी, श्रीमती गंगामाई गर्ल्स हायस्कूल, इचलकरंजी
तृतीय- पयोष्णी सु.दोशी, इ. 10 वी, साई हायस्कूल, दसरा चौक, कोल्हापूर

  जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा- (ग्रामीण)
प्रथम- वैष्णवी युवराज बुरुड, इ. 7 वी, वि.मं.गवसे, चंदगड
व्दितीय- यासिरा सरफराज मकुभाई, इ. 9 वी, म. गांधी विद्यालय, रुकडी, ता. हातकणंगले
तृतीय- आरोही संभाजी पाटील, इ. 6 वी, केंद्रशाळा तारळे खुर्द, ता. राधानगरी

  चित्रकला स्पर्धा- कोल्हापूर महानगरपालिका व इचलकरंजी नगरपालिका (एकत्रित)
प्रथम- प्रज्वल प्रमोद मोरे, इ. 9 वी, बाळासाहेब पाटील (दादा) हायस्कूल, आळते, हातकणंगले
व्दितीय- श्रेया संजय पाटील, इ. 11 वी, आजरा ज्युनि. कॉलेज, आजरा
तृतीय- क्षितीजा विनय पोवार, सिंबॉयसिस स्कूल, हरळी बुद्रूक, ता. गडहिंग्लज 

  चित्रकला स्पर्धा (कॉलेज/शालेयस्तर)-
प्रथम- चैतन्य रविंद्र म्हेत्रे, इ. 9 वी, शहापूर हायस्कूल, शहापूर, इचलकरंजी
व्दितीय- सोहन नागेश हंकारे, इ. 8 वी, आदर्श प्रशाला, राधानगरी रोड, कोल्हापूर
तृतीय- वेदिका उत्तम यमगर, 7 वी, हु.बाबू गेनू विद्यामंदिर, क्र. 28, इचलकरंजी

  कोल्हापूर जिल्हा ग्रामीण (12 तालुके एकत्रित)
प्रथम- प्रज्वल प्रमोद मोरे, इ. 9 वी, बाळासाहेब पाटील (दादा) हायस्कूल, आळते, हातकणंगले
व्दितीय- श्रेया संजय पाटील, इ. 11 वी, आजरा ज्युनि. कॉलेज, आजरा
तृतीय- क्षितीजा विनय पोवार, सिंबॉयसिस स्कूल, हरळी बुद्रूक, ता. गडहिंग्लज 

  चित्रकला स्पर्धा- 
प्रथम- आरती पिंटू कोळी, स.भू.एस.के.पाटील महाविद्यालय, कुरुंदवाड, कोल्हापूर, 
व्दितीय - भक्ती मंगेश उतरंडे, कमला कॉलेज, कोल्हापूर
तृतीय- प्रतिक्षा विजय घाटगे, शिवराज महाविद्यालय, गडहिंग्लज

  निबंध स्पर्धा-
प्रथम- महेक रमजान खानजादे, राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय, रुकडी, कोल्हापूर
व्दितीय- प्राजक्ता संदीप साळोखे, कमला कॉलेज, कोल्हापूर
तृतीय- भक्ती मंगेश अतरंडे, कमला कॉलेज, कोल्हापूर

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes