नांदगाव येथे कृषी विषयक ग्राम परिसंवाद कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन
schedule17 Oct 25 person by visibility 64 categoryसामाजिक

कोल्हापूर : भारतीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्ली, अंतर्गत पायाभूत सेवा प्रशिक्षण, राष्ट्रीय कृषी संशोधन व्यवस्थापण अद्यादमी हैदराबाद व कृषि विज्ञान केंद्र कणेरी कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने नांदगाव येथे दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी कृषी विषयक ग्राम परिसंवाद तसेच १५ ऑक्टोबर रोजी संस्थात्मक सेमिनारचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांना शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या सेमिनारला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. महंतेश शिरूर (प्राचार्य वैज्ञानिक - मॉनिटरिंग फॅकल्टी, NAARM Hyderabad), श्रीमती ज्योती कुंभार उपसरपंच नंदगाव , श्री. पांडुरंग काळे (प्रमुख, केव्हीके कोल्हापूर), डॉ. सुनील कुमार (FET समन्वयक) तसेच श्री. मारुती निघवे व श्री. संजय नरके (संचालक, श्री शाहू साखर कारखाना, कोल्हापूर) आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रियांका राहुल कोडग यांनी केले तर संपूर्ण नियोजन व व्यवस्थापन पायाभूत सेवा प्रशिक्षण, राष्ट्रीय कृषी संशोधन व्यवस्थापण अद्यादमी हैदराबाद व कृषि विज्ञान केंद्र कणेरी कोल्हापूर टीम (डॉ. पार्थ, डॉ. अंकिता वर्मा, डॉ. श्रिनीकेतन, डॉ. नवीन कुमार, डॉ. सत्यव्रत) यांनी सांभाळले. आभार प्रदर्शन अतुल कुंभार यांनी केले.
सेमिनारदरम्यान सहभागी ग्रामीण मूल्यांकन तंत्राचा वापर करून नदगाव गावाचा सखोल अभ्यास सादर करण्यात आला. यामध्ये कृषिअनुकूल नकाशा, संसाधन नकाशा, तंत्रज्ञानाचा वापर, पारंपरिक ज्ञान यांचा आढावा घेत ग्रामीण समस्यांवर तसेच उपलब्ध संधींवर चर्चा झाली.
ऊस पिक व्यवस्थापनावर पांडुरंग काळे तसेच पशुपालन व दैनंदिन निगा राखण्याबाबत डॉ. पुष्पनाथ चौगुले यांनी मार्गदर्शन केले.
ग्रामपंचायत माजी सरपंच सुंजय पाटील तसेच मदतीसाठी सदैव पुढाकार घेतलेल्या पांडुरंग नरके व सर्व ग्रामस्थांचे विशेष आभार मानण्यात आले.
हा कार्यक्रम शेतकरी व विद्यार्थी यांच्यासाठी अत्यंत ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरला. ग्रामीण भागातील शाश्वत कृषी विकासासाठी अशा उपक्रमांची नितांत आवश्यकता असल्याचे सर्वांनी व्यक्त केले.