SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शेती हाच भारतीय अर्थ व्यवस्थेचा कणा : डॉ अजितकुमार पाटीलडीकेटीईच्या विद्यार्थ्यांची विद्यापीठस्तरीय बुध्दीबळ स्पर्धेत चमकदार कामगिरीस्वर्गीय वसंतदादा पाटील यांना ‘गोकुळ’तर्फे अभिवादननाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीतून सर्वसामान्यांसाठी चांगला कारभार होईल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसप्रभावी बातमी लेखनासाठी ‘एआय’ टूल्स उपयुक्त : कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशोर जस्नानीडी. वाय. पाटील ग्रुपच्या निखिल कदम यांची ‘महादेवा’ प्रकल्पासाठी ‘सिलेक्टर’पदी नियुक्तीप्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी व उन्हाळी हंगामसरकारी कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन अभ्यासक्रमांना प्रोत्साहनबाल कामगार प्रथेविरोधी सप्ताहाचे 14 ते 20 नोव्हेंबर कालावधीत आयोजनकोल्हापूर शहरातील वाहतूक समस्येवर प्रशासक के.मंजूलक्ष्मी व जिल्हा पोलिस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांचाकडून आढावा

जाहिरात

 

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीतून सर्वसामान्यांसाठी चांगला कारभार होईल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

schedule13 Nov 25 person by visibility 62 categoryराज्य

नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेची इमारत राज्यातील सर्वात मोठी आणि सुंदर इमारत आहे. या इमारतीतून सर्वसामान्यांसाठी अतिशय चांगला आणि गतिमान कारभार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

नाशिक - त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सर्कलजवळ उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषद नूतन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,  राज्यातील जिल्हा परिषदांच्या इमारतीपैकी सर्वात सुंदर अशी ही इमारत झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी यांचे अभिनंदन केले पाहिजे. सुसज्ज सुविधांसह असलेली ही इमारत जनसामान्य व्यक्तींना सुविधा देणारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मान्यवरांनी इमारतीची पाहणी केली.

सुरुवातीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी फीत कापून आणि कोनशिलेचे अनावरण करून जिल्हा परिषद इमारतीचे उद्घाटन केले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मान्यवरांचे स्वागत केले.

कार्यक्रमाला मान्यवरांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषदेचे  माजी अध्यक्ष व पदाधिकारी, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी  आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार आदी उपस्थित होते.

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीची वैशिष्ट्य

त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सर्कलजवळ उभारण्यात आलेली नाशिक जिल्हा परिषदेची नूतन प्रशासकीय इमारत जिल्हा परिषदेच्या प्रगतिशील दृष्टिकोनाचे प्रतिक आहे. शाश्वत विकास, ऊर्जा बचत, सुरक्षा आणि सोयी या सर्व बाबींचा विचार करून बांधकाम करण्यात आले आहे.

ऊर्जासक्षम बांधकाम, पुरेसा नैसर्गिक प्रकाश व खेळती हवा, तसेच छतावर सोलर सिस्टीम बसविल्यामुळे वीज खर्च शून्याच्या जवळ जाणार आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे जलसंवर्धन आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना देण्यात आली आहे.

इमारतीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी अध्ययन, संशोधन आणि संदर्भासाठी सुविधा आहे. महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र, सुरक्षित व आरामदायी विश्रांतीगृह तयार करण्यात आले आहेत.

परिषद, प्रशिक्षण, बैठका आणि कार्यक्रमांसाठी आधुनिक सुविधा असलेले बहुउद्देशीय सभागृह आणि सर्वसाधारण सभा हॉल तयार करण्यात आला आहे. यासह मनोरंजन कक्ष,उपहारगृह, अॅम्फीथिएटरयुक्त प्रांगण व कोर्टयार्ड, पार्किंग सुविधा, सुरक्षा यंत्रणा, प्राथमिक उपचार केंद्र, सहा कॉन्फरन्स हॉल, प्रत्येक मजल्यावर ८ ते १२ फूट रुंदीचा पॅसेज, चार लिफ्ट आणि पाच जिन्यांची व्यवस्था, सार्वजनिक सुविधा केंद्र, बँक कार्यालये, दिव्यांग कक्ष, अभिलेख कक्ष, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रूम यांसारख्या सुविधा देखील इमारतीत आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes