डीकेटीईच्या विद्यार्थ्यांची विद्यापीठस्तरीय बुध्दीबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी
schedule13 Nov 25 person by visibility 58 categoryक्रीडा
इचलकरंजी : डीकेटीईच्या टेक्स्टाईल अँण्ड इंजिनिअरींग इन्स्टियूटच्या पुरुष व महिला बुध्दीबळ संघाची विद्यापीठस्तरीय झोनल स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. सदर विद्यार्थ्यांची इंटर झोनल बुध्दीबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामुळे डीकेटीईच्या बुध्दीबळ संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
डॉ ए. डी. शिंदे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, गडहिग्लज येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत डीकेटीईच्या संघानी उपविजेतेपदाचे बक्षिस संपादन केले आहे. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी डीकेटीईकडून वेळोवेळी प्रोत्साहन देण्यात येते यामुळेच येथील विद्यार्थी अशा स्पर्धेमध्ये विविध कला गुणांचे सादरीकरण करुण आपला ठसा अशा स्पर्धेमध्ये उमटवतात यामुळेच इचलकरंजी आणि डीकेटीईचे नांव अशा विविध स्पर्धेमध्ये सन्मानाने घेतले जाते.
विजयी पुरुष संघामध्ये तन्मय पवार, विहान नरगुंडे, युग भराडिया, प्रणव पाटणी, शार्दुल राखुंडे, तर महिला संघामध्ये दिशा पाटील, शिवानी जमखंडी, आकांक्षा कुंजतवाड, स्वरा दमुगडे व सलोनी नार्वेकर यांचा सहभाग होता. डीकेटीईच्या खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत दाखवलेली तत्परता, स्थिरचित्तता, अचूक निर्णयक्षमता आणि संघभावना हे त्यांच्या यशाचे मुख्य घटक ठरले. प्रत्येक सामन्यात त्यांनी अचूक रणनीती आखून प्रतिस्पर्धांना कठीण आव्हान दिले आणि आपल्या उत्कृष्ट क्रीडाभावनेने सर्वांचे मन जिंकले.
विजयी मुले व मुलींच्या संघास संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्वस्त, संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ. एल.एस. आडमुठे, डे. डायरेक्टर डॉ यु. जे. पाटील, स्पोर्टस इनचार्ज ओंकार खानाज यांचे मार्गदर्शन लाभले.