शेती हाच भारतीय अर्थ व्यवस्थेचा कणा : डॉ अजितकुमार पाटील
schedule13 Nov 25 person by visibility 94 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका शिक्षण समितीचे राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रं.११ कसबा बावडा या शाळेत 11 व 12 नोव्हेंबर रोजी शाळेत परसबाग कार्यशाळा संपन्न झाली याप्रसंगी शैक्षणिक पर्यवेक्षक चंद्रकांत कुंभार याच्या हस्ते परस बाग साठी सहकार्य करणाऱ्या विद्यार्थी, पालक याचा सत्कार करण्यात आला .या प्रसंगी शाळेचे केंद्र मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी शैक्षणिक पर्यवेक्षक चंद्रकांत कुंभार, सामाजिक कार्यकर्ते सचिन चौगले, भारतवीर मित्र मंडळाचे अध्यक्ष निलेश पिसाळ, शाहरुख शेख यांचे रोप देवून स्वागत केले.
केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी शासनाच्या परसबाग चा उद्देश समजावून सांगितला. परस बागेची रचना व हवामानानुसार भाज्यांची लागवड भाज्यांची विविधता देशी वाण कमी पाण्यात लागणारा भाज्यांचा समावेश सेंद्रिय परसबाग सिंचन पद्धतीचा वापर शाळेतील अन्नपदार्थ मधील टाकाऊ पासून उपयोग केलेले पदार्थाचा वापर परसबागेतील भाज्यांचे पोषक तत्वांची माहिती उदाहरणात शेवगा कांदा वांगी दोडका चिंच कढीपत्ता कोरफड तुळस आव या प्रकारचे विद्यार्थ्यांनी आठवड्यातून आपल्या पोषण आहारामध्ये समावेश करावा आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी हा उपक्रम सुरू असल्याचे सांगितले यामध्ये भागातील सामाजिक मंडळे एनजीओ संस्था यांच्या सहकार्याने शाळेमध्ये इको क्लब स्थापन करण्यात आलेले आहे व ते एको क्लबचे अंतर्गत हे उपक्रम विद्यार्थी पालक व शिक्षक यांच्या सहकार्याने सुरू आहेत.
परसबागेसाठी भागातील सामाजिक कार्यकर्ते सचिन हरीश चौगले यांनी परसबागेच्या निर्मितीसाठी एक डंपर ट्रेलर तांबडी माती देऊन सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
परसबागेत तुळस, कांदा पात, वांगे, कोथिंबीर, मेथी, कढीपत्ता, मिरची, भोपळा, दोडके, गवारी, टोमॅटो बटाटे यांची लागण केलेली दिसून आली. परसबागेतील रोपांची लागण विद्यार्थी व शिक्षकांनी केलेली दिसून आली. शाळेचे केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी परसबागेत लागणार्या भाज्यांचा वापर शाळेतील मुलांसाठी पोषण आहार मधे केला जातो असे सांगितले.
परसबागेला शाळेचे विद्यार्थी नियमित पाणी देतात व त्याची देखभाल करतात. आजच्या कार्यक्रमासाठी शाळा उपमुख्याध्यापक उत्तम कुंभार, उत्तम पाटील ,आर.जी. किर्तीकर , अमित पोटकुले, तमेजा मुजावर ,विद्या पाटील, दिपाली यादव, बालवाडी शिक्षिका कल्पना पाटील व सावित्री काळे,पायल पाटील,शीतल पाटील,नीलम पाटोळे,खुशबू शेख,निशिगंधा वाघमारे,तुकाराम लाखे,पूनम कुंभार हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आर.जी.किर्तीकर यांनी केले तर आभार अमित पोटकुले यांनी मानले.कार्यक्रमासाठी विद्यार्थी,पालक व भागातील नागरीक उपस्थित होते.