+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustशेतकरी संघटना विधानसभेच्या निवडणूक रिंगणात: ७ उमेदवार जाहीर; करवीरमधून अँड. माणिक शिंदे adjustकोल्हापुरात प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांकडून 35 हजार रुपये दंड वसूल; व्यापाऱ्यांकडून 300 किलो प्लास्टिक जप्त adjustविधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही adjust‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना : नवीन ४००० बायोगॅस मंजुर; या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा : चेअरमन अरुण डोंगळे adjustभागीरथी संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने प्रबुध्द भारत हायस्कूलमधील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन प्रदान adjustमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या घरी प्राप्तीकर विभागाचा छापा... adjustकोल्हापूर महानगरपालिका : वर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणाऱ्या 17 ॲटो टिप्पर गाडयांवरील ड्रायव्हरांचे एक दिवसाचे वेतन कपात adjustकोल्हापुरात शेतकऱ्यांचा निर्धार : महायुतीचे ७२ उमेदवार पाडणार adjust२७ ग्रॅम सोन्याचा धनहार जप्त adjustकोल्हापुरात २५ हजाराची लाच स्वीकारताना जीएसटी कर अधिकाऱ्यास अटक
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule13 Sep 24 person by visibility 271 categoryराजकीय
कोल्हापूर : अमेरिकेत जाऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षण संपवण्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्यावतीने बिंदू चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. 

यावेळी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आरक्षण रद्द करू पाहणाऱ्या राहुल गांधीच्या निषेधार्थ घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. यावेळी भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहूल चिकोडे, सत्यजित कदम, नाथाजी पाटील, राजवर्धन नाईक-निंबाळकर, माणिक पाटील-चुयेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.  

भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले, राहुल गांधी यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा भाजपा कोल्हापूरच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. आज संविधानाच्या सन्मानासाठी भाजपा मैदानात उतरली आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेले संविधान नष्ट करण्याचे काम काँग्रेस नेते राहुल गांधी करत आहेत. काँग्रेस पक्षाला जनतेचे काही पडलेले नाही फक्त आणि फक्त सोयीनुसार आपली पोळी भाजून घेण्याचे काम आज अखेर काँग्रेस पक्ष करत आलेला आहे. 

यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणावर केलेल्या व्यक्तव्याचा भाजपा म्हणून निषेध करतो. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित, आदिवासी, ओबीसी, मागासवर्गीयांना दिलेले आरक्षण हे कोणीही संपवू शकत नाही. गेल्या लोकसभेमध्ये भाजपला चारशे जागा कशासाठी पाहिजे आहेत, तर आरक्षण रद्द करण्यासाठी पाहिजे आहेत असा खोटा आरोप ज्या काँग्रेसने केला त्या काँग्रेसचा खरा चेहरा आता जनतेसमोर येत आहे. सातत्याने बघितले तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करण्याचे काम काँग्रेसचे राहुल गांधी करीत असल्याचे आपल्याला दिसत आहे. ज्या काँग्रेस पक्षाने आरक्षणावर राजकारण करण्याचे काम केले आहे. त्यांना जनता येत्या विधानसभेमध्ये जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही. 

यावेळी प्र का सदस्य राहूल चिकोडे, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, सत्यजित कदम, हेमंत आराध्ये यांनी तीव्र शब्दात निषेध करत आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सरचिटणीस डॉ राजवर्धन, डॉ. आनंद गुरव, जिल्हा उपाध्यक्ष राजू मोरे, अप्पा लाड, भरत काळे, अतुल चव्हाण, प्रदीप उलपे, विशाल शिराळकर, अभिजित शिंदे, गिरीष साळोखे, संदीप कुंभार, दिलीप मेत्राणी, किरण नकाते, अनिल कामत, प्रकाश घाटगे, राहुल सोनटक्के, सचिन आवळे, रविकिरण गवळी, दिलीप बोंद्रे, ओंकार गोसावी, रणजीत औंधकर, बंकट सूर्यवंशी, सुमित पारखे, सतीश आंबर्डेकर, महेश यादव, सचिन घाटगे, संजय पाटील, शिवाजी बुवा, योगेश साळोखे, सनी आवळे, सतीश रास्ते, नरेंद्र पाटील, सुधीर बोलावे, प्रशांत अवघडे, महेश चौगले, प्रमोद कांबळे, भगवान काटे ई. पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.