+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustशेतकरी संघटना विधानसभेच्या निवडणूक रिंगणात: ७ उमेदवार जाहीर; करवीरमधून अँड. माणिक शिंदे adjustकोल्हापुरात प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांकडून 35 हजार रुपये दंड वसूल; व्यापाऱ्यांकडून 300 किलो प्लास्टिक जप्त adjustविधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही adjust‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना : नवीन ४००० बायोगॅस मंजुर; या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा : चेअरमन अरुण डोंगळे adjustभागीरथी संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने प्रबुध्द भारत हायस्कूलमधील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन प्रदान adjustमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या घरी प्राप्तीकर विभागाचा छापा... adjustकोल्हापूर महानगरपालिका : वर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणाऱ्या 17 ॲटो टिप्पर गाडयांवरील ड्रायव्हरांचे एक दिवसाचे वेतन कपात adjustकोल्हापुरात शेतकऱ्यांचा निर्धार : महायुतीचे ७२ उमेदवार पाडणार adjust२७ ग्रॅम सोन्याचा धनहार जप्त adjustकोल्हापुरात २५ हजाराची लाच स्वीकारताना जीएसटी कर अधिकाऱ्यास अटक
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule01 Oct 24 person by visibility 268 categoryराजकीय
कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुका लढवण्याची तयारी आम आदमी पार्टीकडून सुरु करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आप कार्यकर्त्यांचा मेळावा प्रदेश कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. आगामी निवडणूक पक्षाने ताकदीने लढवावी, सर्व कार्यकर्ते यासाठी जोमाने कामाला लागतील असा सुर शाहू स्मारक येथे पार पडलेल्या मेळाव्यात निघाला. 

शहरातील अनेक ज्वलंत प्रश्नांना सोडवण्याचे काम आप ने केले आहे. जिल्हातील उत्तर, दक्षिण, कागल, शिरोळ या जागांसाठी पक्षाकडे मागणी केलेली आहे. उत्तर मधून उमेदवारी दिल्यास ताकदीने लढणार असल्याचे आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या माध्यमातून आम आदमी पार्टीने महाविकास आघाडीची भक्कम साथ दिली. त्यावेळी देशाचे संविधान वाचवणे ही प्राथमिकता होती. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. येणारी विधानसभा पक्ष जोमाने लढवणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय नेतृत्वासोबत चर्चा सुरु आहे. जेवढा प्रयत्न कार्यकर्ते म्हणून तुम्ही करणार नाही तेवढा प्रयत्न आम्ही तुमच्यासाठी करू, गरज पडल्यास महाविकास आघाडीच्या नाकावर टिचून विधानसभा लढवू असा इशारा प्रदेश कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.

जिल्हाध्यक्ष अरुण गळतगे, उत्तम पाटील, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी,समीर लतीफ, दुष्यंत माने, प्रसाद सुतार, विजय हेगडे, बबन कावडे यांची भाषणे झाली. 

प्रास्ताविक अभिजित कांबळे, मोहसीन शेख यांनी सूत्रसंचालन केले, समीर लतीफ यांनी आभार मानले.