+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustशेतकरी संघटना विधानसभेच्या निवडणूक रिंगणात: ७ उमेदवार जाहीर; करवीरमधून अँड. माणिक शिंदे adjustकोल्हापुरात प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांकडून 35 हजार रुपये दंड वसूल; व्यापाऱ्यांकडून 300 किलो प्लास्टिक जप्त adjustविधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही adjust‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना : नवीन ४००० बायोगॅस मंजुर; या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा : चेअरमन अरुण डोंगळे adjustभागीरथी संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने प्रबुध्द भारत हायस्कूलमधील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन प्रदान adjustमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या घरी प्राप्तीकर विभागाचा छापा... adjustकोल्हापूर महानगरपालिका : वर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणाऱ्या 17 ॲटो टिप्पर गाडयांवरील ड्रायव्हरांचे एक दिवसाचे वेतन कपात adjustकोल्हापुरात शेतकऱ्यांचा निर्धार : महायुतीचे ७२ उमेदवार पाडणार adjust२७ ग्रॅम सोन्याचा धनहार जप्त adjustकोल्हापुरात २५ हजाराची लाच स्वीकारताना जीएसटी कर अधिकाऱ्यास अटक
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule19 Oct 24 person by visibility 203 categoryसामाजिक
कोल्हापूर : संशोधकाने संशोधनाचे केंद्रबिंदू बदलत राहिले पाहिजे असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. डि. टी. शिर्के यांनी केले. ते शिवाजी विद्यापीठातील मराठी विभाग आयोजित पीएच. डी. मार्गदर्शक आणि विद्यार्थी मार्गदर्शन कार्यशाळेत उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

 आपल्या मनोगत ते पुढे म्हणाले की, आपले संशोधन हे पुढच्या पिढीने संदर्भ म्हणून वापरले पाहिजे एवढे ते दर्जेदार झाले पाहिजे. तसेच संशोधनात संशोधकाने वाचन, चिंतन केले पाहिजे. प्रा. रणधीर शिंदे यांनी आपल्या मनोगतात शिवाजी विद्यापीठातील पूर्व संशोधनाचा आढावा घेतला. सशोधनाची परंपरा सांगितली. तर प्रास्ताविकात विभाग प्रमुख डॉ नंदकुमार मोरे यांनी या कार्यशाळेमागची भूमिका मांडली. ते आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की, संशोधनात संख्यात्मक दर्जापेक्षा गुणात्मक दर्जा वाढला पाहिजे. तसेच त्यांनी आजच्या संशोधनाच्या सद्यस्थितीवर भाष्य केले. 

दिवसभर चाललेल्या कार्यशाळेमध्ये डॉ. प्रभाकर देसाई, डॉ. अनिल गवळी, डॉ. गोविंद काजरेकर, डॉ. गोमटेश्वर पाटील या मार्गदर्शक वक्त्यांनी संशोधनाची दृष्टी विविध परिप्रेक्ष्य, संशोधनाचे आंतरविद्याशाखीय स्वरूप, प्रबंध मांडणीः शिस्त आणि नैतिकता, प्रबंधविषयः जबाबदारी आणि आवश्यक काळजी, संशोधनसाधने वापरण्याचे कौशल्य या विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी शिवाजी विद्यापीठ संलग्‍नीत महाविद्यालयातील दोनशेहून अधिक पीएच.डी. मार्गदर्शक आणि संशोधक विद्यार्थी सहभागी झाले होते. सूत्रसंचालन भक्ती नाईक तर आभार डॉ. सुखदेव एकल यांनी मानले.