+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustशेतकरी संघटना विधानसभेच्या निवडणूक रिंगणात: ७ उमेदवार जाहीर; करवीरमधून अँड. माणिक शिंदे adjustकोल्हापुरात प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांकडून 35 हजार रुपये दंड वसूल; व्यापाऱ्यांकडून 300 किलो प्लास्टिक जप्त adjustविधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही adjust‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना : नवीन ४००० बायोगॅस मंजुर; या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा : चेअरमन अरुण डोंगळे adjustभागीरथी संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने प्रबुध्द भारत हायस्कूलमधील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन प्रदान adjustमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या घरी प्राप्तीकर विभागाचा छापा... adjustकोल्हापूर महानगरपालिका : वर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणाऱ्या 17 ॲटो टिप्पर गाडयांवरील ड्रायव्हरांचे एक दिवसाचे वेतन कपात adjustकोल्हापुरात शेतकऱ्यांचा निर्धार : महायुतीचे ७२ उमेदवार पाडणार adjust२७ ग्रॅम सोन्याचा धनहार जप्त adjustकोल्हापुरात २५ हजाराची लाच स्वीकारताना जीएसटी कर अधिकाऱ्यास अटक
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule26 Sep 24 person by visibility 297 categoryराजकीय
कोल्हापूर : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आवाडे व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. विशेष म्हणजे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर हे आवाडे पिता-पुत्रांना घेऊन स्टेजवर आले. या माध्यमातून भारतीय जनता पक्षात आवाडे यांच्या प्रवेशावरुन कसलेही मतभेद नाहीत हे दाखवून देत विकासाच्या नव्या अध्यायाला प्रारंभ झाल्याचे दिसून आले.

आगामी विधानसभा निवडणुकीत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून राहुल आवाडे यांची उमेदवारी महायुतीकडून निश्चित मानली जात आहे. विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांनी आपण निवडणूक लढविणार नाही असे यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यांचे पुत्र व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे हे विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. मात्र ते स्वतंत्र लढणार की भाजपात प्रवेश करणार या विषयी तर्कवितर्क लढविले जात होते. कारण भाजपाचे माजी आमदार सुरेश हाळवणकर हे देखील विधानसभेसाठी इच्छुक होते. यामुळे आवाडे यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला होता. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारत ता. २५ रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापुरात पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी मेळावा झाला. 

या मेळाव्यामध्ये केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी आमदार प्रकाश आवाडे, मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या गळ्यात भाजपाचा स्कार्फ घालून, त्यांना पक्ष प्रवेश दिला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र भाजपा निवडणूक प्रभारी भूपेंद्रजी यादव , केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, खासदार धनंजय महाडिक, महाराष्ट्राचे कामगार मंत्री सुरेश खाडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, मोश्मी आवाडे यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.