+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustशेतकरी संघटना विधानसभेच्या निवडणूक रिंगणात: ७ उमेदवार जाहीर; करवीरमधून अँड. माणिक शिंदे adjustकोल्हापुरात प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांकडून 35 हजार रुपये दंड वसूल; व्यापाऱ्यांकडून 300 किलो प्लास्टिक जप्त adjustविधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही adjust‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना : नवीन ४००० बायोगॅस मंजुर; या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा : चेअरमन अरुण डोंगळे adjustभागीरथी संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने प्रबुध्द भारत हायस्कूलमधील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन प्रदान adjustमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या घरी प्राप्तीकर विभागाचा छापा... adjustकोल्हापूर महानगरपालिका : वर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणाऱ्या 17 ॲटो टिप्पर गाडयांवरील ड्रायव्हरांचे एक दिवसाचे वेतन कपात adjustकोल्हापुरात शेतकऱ्यांचा निर्धार : महायुतीचे ७२ उमेदवार पाडणार adjust२७ ग्रॅम सोन्याचा धनहार जप्त adjustकोल्हापुरात २५ हजाराची लाच स्वीकारताना जीएसटी कर अधिकाऱ्यास अटक
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule09 Oct 24 person by visibility 204 categoryराजकीय
कोल्हापूर : भाजपाने हरियाणा राज्यात बहुमताने तिसऱ्यांदा विजयी होत हैट्रिक केल्याबद्दल भाजपा कोल्हापूरच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र येत उपस्थित सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज कि जय, जय शिवाजी जय भवानी, वंदे मातरम, भारत माता कि जय अशा घोषणांचा जयघोष करून छ.शिवाजी चौक दणाणून सोडला, यावेळी वातावरण शिवमय झाले होते.

याप्रसंगी बोलताना भाजपा प्र. का. सदस्य राहुल चिकोडे म्हणाले, आजचा हरियाणा मधील विजय हा देशांमध्ये आजही सर्वसामान्य नागरिक, शेतकऱ्यांचा, तरुणांचा सर्वांचा मोदीजींवरील विश्वास स्पष्ट करत आहे. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शैलेश पाटील यांनी संपूर्ण देश आणि देशातील जनता ही भाजपाच्या पाठीशी आहे असे मत व्यक्त केले. 

जिल्हा सरचिटणीस डॉ राजवर्धन यांनी देशातील लोकसभेनंतर सुद्धा विरोधी पक्षांनी हरियाणामध्ये पसरविलेले अनेक नेरेटिंग या निकालाने तेथील जनतेने खोटे असल्याचे सिद्ध केले व जनता भाजपच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी विराज चिखकीकर, अमर साठे, संगीता तांबे, सुरेश गुजर, महेश यादव, विशाल शिराळकर, अप्पा लाड, सयाजी आळवेकर, किरण नकाते, दिलीप बॉंद्रे, सागर रांगोळे, धीरज पाटील, गिरीष साळोखे, रविकिरण गवळी, अजित सुरूवंशी, सिद्धू पिसे, संतोष माळी, राजेंद्र वडगांवकर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.