+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustशेतकरी संघटना विधानसभेच्या निवडणूक रिंगणात: ७ उमेदवार जाहीर; करवीरमधून अँड. माणिक शिंदे adjustकोल्हापुरात प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांकडून 35 हजार रुपये दंड वसूल; व्यापाऱ्यांकडून 300 किलो प्लास्टिक जप्त adjustविधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही adjust‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना : नवीन ४००० बायोगॅस मंजुर; या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा : चेअरमन अरुण डोंगळे adjustभागीरथी संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने प्रबुध्द भारत हायस्कूलमधील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन प्रदान adjustमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या घरी प्राप्तीकर विभागाचा छापा... adjustकोल्हापूर महानगरपालिका : वर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणाऱ्या 17 ॲटो टिप्पर गाडयांवरील ड्रायव्हरांचे एक दिवसाचे वेतन कपात adjustकोल्हापुरात शेतकऱ्यांचा निर्धार : महायुतीचे ७२ उमेदवार पाडणार adjust२७ ग्रॅम सोन्याचा धनहार जप्त adjustकोल्हापुरात २५ हजाराची लाच स्वीकारताना जीएसटी कर अधिकाऱ्यास अटक
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule20 Oct 24 person by visibility 309 categoryराज्य
मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदेंना दिले होते. यावेळी आयोगाने उद्धव ठाकरेंना मशाल हे चिन्ह दिले होते. या चिन्हामध्ये उद्धव ठाकरे यांनी काही बदल करण्याची मागणी केली होती. त्यात निवडणूक आयोगाने मान्यता दिली असून विधानसभा निवडणुकीपूर्वी हे नवे सुधारित चिन्ह देण्यात आले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मशालच चिन्ह कायम ठेवण्यात आले आहे. मशाल हातात धरण्याचा जो आकार होता तो आईस्क्रीमच्या कोनासारखा वाटत होता. तो बदलून आता वरती पेटत्या ज्वाळा आणि खाली बॅटरीसारखा आकार देण्यात आला आहे. तसेच आतील भगवा रंग काढण्यात आला आहे.

 यामुळे विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमवरही टॉर्च सारखेच दिसणारे नवे निवडणूक चिन्ह दिसणार आहे. पेटत्या मशालीचा आणि शिवसेनेचा खूप आधी पासूनचा संबंध आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेनेने १९८५ मध्ये पेटत्या मशालीच्या चिन्हावर निवडणूक लढविली होती.