+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustशेतकरी संघटना विधानसभेच्या निवडणूक रिंगणात: ७ उमेदवार जाहीर; करवीरमधून अँड. माणिक शिंदे adjustकोल्हापुरात प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांकडून 35 हजार रुपये दंड वसूल; व्यापाऱ्यांकडून 300 किलो प्लास्टिक जप्त adjustविधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही adjust‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना : नवीन ४००० बायोगॅस मंजुर; या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा : चेअरमन अरुण डोंगळे adjustभागीरथी संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने प्रबुध्द भारत हायस्कूलमधील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन प्रदान adjustमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या घरी प्राप्तीकर विभागाचा छापा... adjustकोल्हापूर महानगरपालिका : वर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणाऱ्या 17 ॲटो टिप्पर गाडयांवरील ड्रायव्हरांचे एक दिवसाचे वेतन कपात adjustकोल्हापुरात शेतकऱ्यांचा निर्धार : महायुतीचे ७२ उमेदवार पाडणार adjust२७ ग्रॅम सोन्याचा धनहार जप्त adjustकोल्हापुरात २५ हजाराची लाच स्वीकारताना जीएसटी कर अधिकाऱ्यास अटक
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule18 Oct 24 person by visibility 267 categoryसामाजिक
 ▪️विद्यापीठात जनमानसातील अन्नाविषयीचे संभ्रम दूर करणारे प्रदर्शन

कोल्हापूर : मनुष्य आपल्या राहणीमानाविषयी तसेच खानपान सवयींविषयी अधिक जागरूक झाला आहे. त्याच्यावर विविध माध्यमांतून चांगल्या आरोग्यासाठी हे करा, ते करू नका; हे खा, ते खाऊ नका अशा प्रकारच्या संदेशांचा भडिमार सुरू असतो. त्यामुळे आपल्या मनात अनेक प्रकारचे संभ्रम निर्माण होतात. नेमके हेच संभ्रम दूर करणारे एक महत्त्वाचे पोस्टर प्रदर्शन शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात अन्नशास्त्र व तंत्रज्ञान अधिविभागाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. उद्या (दि. १९) दुपारपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे.

जागतिक अन्न दिनाच्या निमित्ताने ‘चांगले आरोग्य आणि उज्ज्वल भवितव्य यासाठी अन्नाचा अधिकार’ या विषयावर अन्नशास्त्र व तंत्रज्ञान अधिविभागातर्फे विशेष पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. अन्नाच्या हक्काबद्दल जागरूकता वाढविण्याबरोबरच अन्न प्रक्रिया व अन्नाशी संबंधित मिथके, विविध अन्नपदार्थांच्या अनुषंगाने जनमानसात प्रचलित गैरसमज आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती याविषयी माहिती विद्यार्थ्यांकडून देण्यात येत आहे. आज सकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांनी प्रदर्शनाची पाहणी केली आणि विद्यार्थ्यांनी अतिशय महत्त्वाच्या विषयाची प्रबोधनासाठी निवड केल्याचे सांगून अभिनंदन केले. यावेळी विभागप्रमुख डॉ. प्रवीणकुमार पाटील यांच्यासह समन्वयक डॉ. अभिजीत गाताडे, डॉ. हर्षवर्धन पाटील यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

▪️प्रदर्शनाविषयी थोडक्यात...
आपल्या मनात खाद्यपदार्थांविषयी अनेक शंकाकुशंका असतात. आरोग्यासाठी साखरेपेक्षा गूळ चांगला, अॅल्युमिनिअमच्या भांड्यात अन्न शिजवल्याने अल्झायमर्स होतो, कृत्रिम चवीपेक्षा नैसर्गिक चवीचे पदार्थ चांगले, फळांवरील मेणाचा थर घातक, लांबट स्नॅक्स पदार्थांत प्लास्टीक असते, बेकरीचे पदार्थ आरोग्याला घातक, तेलापेक्षा तुपातील पदार्थ अधिक आरोग्यदायी, अजिनोमोटो (मोनोसोडियम ग्लुटामेट) चांगला की वाईट, प्रक्रिया केलेल्या मधापेक्षा कच्चा मध उत्तम अशा अनेक धारणा आणि संभ्रमही असतात. अशा सर्व शंकांचे निराकरण करणारे सादरीकरण २२ विविध स्टॉल्सच्या माध्यमातून १००हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी केलेले आहे. उद्यापर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनाचा इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. प्रवीणकुमार पाटील यांनी केले आहे.