+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustशेतकरी संघटना विधानसभेच्या निवडणूक रिंगणात: ७ उमेदवार जाहीर; करवीरमधून अँड. माणिक शिंदे adjustकोल्हापुरात प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांकडून 35 हजार रुपये दंड वसूल; व्यापाऱ्यांकडून 300 किलो प्लास्टिक जप्त adjustविधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही adjust‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना : नवीन ४००० बायोगॅस मंजुर; या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा : चेअरमन अरुण डोंगळे adjustभागीरथी संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने प्रबुध्द भारत हायस्कूलमधील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन प्रदान adjustमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या घरी प्राप्तीकर विभागाचा छापा... adjustकोल्हापूर महानगरपालिका : वर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणाऱ्या 17 ॲटो टिप्पर गाडयांवरील ड्रायव्हरांचे एक दिवसाचे वेतन कपात adjustकोल्हापुरात शेतकऱ्यांचा निर्धार : महायुतीचे ७२ उमेदवार पाडणार adjust२७ ग्रॅम सोन्याचा धनहार जप्त adjustकोल्हापुरात २५ हजाराची लाच स्वीकारताना जीएसटी कर अधिकाऱ्यास अटक
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule18 Oct 24 person by visibility 216 categoryसामाजिक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा २०२४ सालचा सतीश काळसेकर काव्य पुरस्कार ज्येष्ठ कवयत्री अनुराधा पाटील (संभाजीनगर ) यांना तर ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार वीरधवल परब (वेंगुर्ला) यांना जाहीर केला आहे. 

सदर पुरस्कार जेष्ठ साहित्यिक भारत सासणे आणि शिवाजी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते सोमवार दि. २१ ऑक्टोबर, २०२४ रोजी वि.स.खांडेकर भाषाभवन येथे सकाळी ११.३० वाजता सन्मानपूर्वक दिला जाणार आहे. 

या समारंभासाठी आदित्य काळसेकर यांच्यासह काळसेकर कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये मराठी विभागप्रमुख प्रा. नंदकुमार मोरे यांनी दिली.