+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustशेतकरी संघटना विधानसभेच्या निवडणूक रिंगणात: ७ उमेदवार जाहीर; करवीरमधून अँड. माणिक शिंदे adjustकोल्हापुरात प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांकडून 35 हजार रुपये दंड वसूल; व्यापाऱ्यांकडून 300 किलो प्लास्टिक जप्त adjustविधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही adjust‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना : नवीन ४००० बायोगॅस मंजुर; या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा : चेअरमन अरुण डोंगळे adjustभागीरथी संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने प्रबुध्द भारत हायस्कूलमधील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन प्रदान adjustमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या घरी प्राप्तीकर विभागाचा छापा... adjustकोल्हापूर महानगरपालिका : वर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणाऱ्या 17 ॲटो टिप्पर गाडयांवरील ड्रायव्हरांचे एक दिवसाचे वेतन कपात adjustकोल्हापुरात शेतकऱ्यांचा निर्धार : महायुतीचे ७२ उमेदवार पाडणार adjust२७ ग्रॅम सोन्याचा धनहार जप्त adjustकोल्हापुरात २५ हजाराची लाच स्वीकारताना जीएसटी कर अधिकाऱ्यास अटक
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule18 Oct 24 person by visibility 416 categoryसामाजिक
कोल्हापूर: विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझ्या नावाची चर्चा सुरू आहे. राजकारण करत असताना एक व्हिजन ठेवून मी काम करत आहे. यापूर्वी महादेवराव महाडिक यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे नेतृत्व केले. खासदार धनंजय महाडिक पश्चिम महाराष्ट्रात राज्यसभा खासदार  म्हणून ते कार्यरत आहेत. मी आपणास विश्वास देतो की येणाऱ्या काळामध्ये महाडिक परिवाराची तिसरी पिढी महाराष्ट्राचे नेतृत्व करेल. यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. अशा भावना यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केल्या.

यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या जीवनावर आधारित कृष्णराज महाडिक - द रायझिंग स्टार या नावांचा माहितीपट तयार केला असून येथील अयोध्या हॉटेल येथे गुरुवारी सायंकाळी दिमाखदार कार्यक्रमात  ट्रेलर अनावरण झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. या माहितीपटाच्या विविध भागातून यूथ आयकॉनची वाटचाल समोर येणार आहे. यानिमित्ताने आयोजित समारंभाला महाडिक कुटुंबीय, समाजातील विविध घटकातील मान्यवरांची उपस्थित होते. 

  कृष्णराज महाडिक म्हणाले आज पर्यंत केलेले कार्य या माहितीपटाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडत आहे. हा प्रवास यातील अनुभव किस्से आपल्यासमोर प्रथमच मांडले आहे. यूट्यूब च्या उत्पन्नाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. त्याचबरोबर मी कोणती अपेक्षा न ठेवता समाज कार्य करत असून कोल्हापुरातील रस्त्यांसाठी 25 कोटी रुपयांचा निधी मला मंजूर करून आणता आला हे या माहितीपटामध्ये मांडण्यात आले आहे येणाऱ्या प्रत्येक रविवारी माहितीपटाचा भाग प्रसारित होणार आहे. चार ते पाच भागाची ही मालिका असणार आहे.

यावेळी खासदार धनंजय महाडिक म्हणाले, कृष्णराज महाडिक यांचा जीवन प्रवास माझ्यासाठी अद्भुत आहे. त्यांनी जे यश मिळवले आहे. त्याचा मला अभिमान आहे. कारण वडील म्हणून मी असे म्हणू शकतो की 'अच्छा इन्सान बन गया, उसी की, बहुत खुशी है! कारण त्याची लोकप्रिय पाहतात माझी आता नवीन ओळख बनली आहे मी कुठे गेलो तरी कृष्णराजचे डॅडी अशी माझी  नवीन ओळख बनली आहे. 

खासदार धनंजय महाडिक म्हणाले की आमदार, खासदार होणे हे काही उद्देश असता कामा नये आपण काम करतो ना. तू उगवता सूर्य आहेस तू उगवणारच आहेस. कोणी किती झाकून दे, माझा ही काळ असाच होता. कोण मुन्ना महाडिक कोल्हापूरच्या जनतेचा खासदार बनवले. अपेक्षा न करता काम करत राहिलास तर लोक आपल्या पाठीशी राहतात.