SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
युवकांनी ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून नोंदणी करावी : मंत्री चंद्रकांत पाटीलसीबीएसई दहावी बोर्ड परीक्षेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; 466 विद्यार्थ्यांपैकी 146 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुणएकसारख्या मतदार ओळखपत्र क्रमांकांचा प्रश्न भारत निवडणूक आयोगाने सोडवलाइचलकरंजी येथे ३०,०००/- रूपयांची लाच स्वीकारताना महावितरण विभागीय कार्यालयातील कार्यकारी अभियंता जाळ्यातजिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने उन्हाळी प्रशिक्षण शिबीराचे आयोजनअँग्लो उर्दू हायस्कूल शिरोली (पु.) एस.एस.सी. चा निकाल 100 टक्केकोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात भाविकांसाठी ड्रेसकोड लागू, भाविकांना आवाहनमहाराष्ट्राचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के; कोकण विभागाची बाजीग्रामदैवत श्री महालक्ष्मी, अंबाबाई देवीच्या उत्सवानिमित्त सुमारे १५ हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभकळंबा येथे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी, अंबाबाई देवीचा पालखी सोहळा, कुंकुमार्चन सोहळा मोठ्या उत्साहात

जाहिरात

 

सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; 466 विद्यार्थ्यांपैकी 146 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण

schedule13 May 25 person by visibility 388 categoryशैक्षणिक

अतिग्रे  : येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई शाळेने ऑल इंडिया सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन (AISSE) 2025 मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत अत्युच्च गुणवत्ता सिद्ध केली. या परीक्षेत शाळेतील एकूण 466 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. विद्यालयाचा 100% निकाल लागला असून, दोन विद्यार्थ्यांनी 98.8% गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. परीक्षेत बसलेल्या 466 विद्यार्थ्यांपैकी 146 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केले.

*सविस्तर निकाल
प्रथम क्रमांक (98.8%) :
तनिष्का सुरेश कदम
पार्थ राजेंद्र शेळके
द्वितीय क्रमांक (98.6%) :
अनय अवधूत देशपांडे
आर्या समीर नवारे
तृतीय क्रमांक (98.4%) :
 मनस्वी किरण पाटील
 सुहानी महेश कांडोई
मान्या सारडा
 क्रिशा देसाई
अथर्व श्रीमंत सालगरे
*निकालाचे संक्षिप्त विश्लेषण :
90% पेक्षा अधिक गुण – 146 विद्यार्थी, 80% ते 90% गुण – 138 विद्यार्थी, 70% ते 80% गुण – 106 विद्यार्थी आहेत.  विविध विषयात शंभर पैकी शंभर गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे.

संस्कृत : 14, मराठी : 4, फ्रेंच : 3, गणित : 2, विज्ञान : 1,  आर्टिफिशियल इंटेलिजन्स : 61विद्यार्थी.


"विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमांना आमच्या गुणवत्तापूर्ण अध्यापन प्रणालीचा भक्कम पाठिंबा लाभल्यामुळेच हे यश शक्य झाले," असे प्रतिपादन यावेळी बोलताना संचालिका सस्मिता मोहंती यांनी व्यक्त केले.
 बोर्डिंग विभागाचे प्राचार्य, डॉ एच एम नवीन, डे बोर्डिंग विभागाचे  प्राचार्य श्री अस्कर अली सर्व शिक्षकवर्ग व पालकांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. चेअरमन  संजय घोडावत विश्वस्त  विनायक भोसले, संचालिका सस्मिता मोहंती यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.  शाळेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes