जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने उन्हाळी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन
schedule13 May 25 person by visibility 236 categoryक्रीडा

कोल्हापूर : जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने दि. २१ ते ३० मे २०२५ या कालावधीत सकाळी ६.३० ते दुपारी १ या वेळेत उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. शिबीराकरीता ८ ते १४ वयोगटातील प्रथम नाव नोंदणी करणा-यांना प्रवेश दिला जाणार आहे. सहभायी प्रशिक्षणाची खेळाडूंना अल्पोपहार व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी, कार्यालय, छत्रपती शिवाजी स्टेडीयम, कोल्हापूर येथील राज्य क्रीडा मार्गदर्शक रवीभूषण कुमठेकर, सोमा पाटील, अनिकेत बोडके यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमतो निलिमा अडसूळ यांनी केले आहे.
उरपती शिवाजी स्टेडीयम येथे आयोजित या शिबिरात योगासन, हॉकी, अॅथलेटिक्स, व्हॉलीबॉल, फुटबॉल, कुस्ती, जिम्नास्टिक्स, जलतरण, एरोबिक्स झुंबा, मल्लखांब, ज्युदो, मैदानी क्रीडा प्रकारातील धावणे, मर्दानी खेळ, (लाठोकाठगे, लेझीम, झांज-ढोल इ.) कोडा प्रकारांची मूलभूत कौशल्ये शिकवली जाणार आहेत. तसेच मूलभूत कौशल्य शिकवून प्रात्यक्षिकांचा सराव घेतला जाणार आहे. तसेच क्रीडा प्रकारांची आवश्यक मूलभूत सुविधा म्हणून आहारविषयक आणि फिजिओथेरपी प्रथमोपचार बाबत तज्ज्ञ व्यक्तीव्दारा व्याख्यान आयोजित केले जाणार आहे, अशी माहितोहो श्रीमती अडसूळ यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.