मतदार यादी सुधारित कार्यक्रम
schedule13 Nov 25 person by visibility 59 categoryराज्य
कोल्हापूर : राज्य निवडणूक आयोगाचे क्रमांक:रानिआ/मनपा-2025/प्र.क्र.41/का-5 दि.04 नोव्हेंबर 2025 च्या आदेशान्वये महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी दि.14 नोव्हेंबर 2025 रोजी पारित करणेबाबत आदेश प्राप्त झाले होते. तथापी, सचिव, राज्य निवडणूक आयोग यांचे क्रमांक:रानिआ/मनपा-2025/प्र.क्र.41/का-5 दि.13 नोव्हेंबर 2025 च्या आदेशाने सदर मतदार यादीचा कार्यक्रम पुन्हा: सुधारित करण्यात आला आहे.
यामध्ये प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी गुरुवार दि.20 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आहे. प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक गुरुवार दि.20 नोव्हेंबर 2025 ते गुरुवार दि.27 नोव्हेंबर 2025 (सकाळी 10.00 ते सायं.5.00) पर्यंत राहणार आहे. प्रारुप मतदार यादीवर दाखल हरकतीवर निर्णय घेऊन प्रभाग निहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करुन प्रसिद्ध दि.05 डिसेंबर 2025 रोजी करण्यात येणार आहे. तसेच मतदान केंद्राच्या ठिकाणांची यादी दि.08 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
तर मतदान केंद्र निहाय मतदार यादी दि.12 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.